?कोकण म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व
तिला आधार देणारा दिवा….
?कोकण म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि
गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू…..
?कोकण म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा,
त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या….
?कोकण म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं
जातं, आज्जीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला कारभारणीचा चेहरा,
?कोकण म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ,
सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर,….
?कोकण म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव,
रोखून बघत असलेले मानाचे दगड…….
?कोकण म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ……
?कोकण म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण,
त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई……
?कोकण म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडलांची पुण्याई….
?कोकण म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी
माडापोफळीची झाडं…..
?कोकण म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि
कण्हेरीची फुलं…..
?कोकण म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं,
चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण,
?कोकण म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला
बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा……
?कोकण म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या
आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी…..
?कोकण म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे
आणि वाटप घातलेली उसळ,
?कोकण म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली
पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत
असलेलं लोणचं…..
?कोकण म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार
पाउस, आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर….
?कोकण म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं,डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ…..
?कोकण म्हणजे लाल डब्याची एष्टी, धुरळा आणि
नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा…..
?कोकण म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा भात उसळ
आणि लाऊडस्पीकर….
?कोकण म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक,
उसळ आणि डबलबाऱ्या,
?कोकण म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट,
करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल,
?कोकण म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, आणि मारलेल्या बोंबा……
?कोकण म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती,
शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्या आणि
पोरांचं भजन..
?कोकण म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा,
पूजा , शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं……..
?कोकण म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप,
धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला,
?कोकण म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं,पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि “टुरलामेंट”……..
?कोकण म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा,
ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं,चकवणारे मासे, लागलेली रापण,
ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका…..
—————‘—–
?कोकण म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या
माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या,
?कोकण म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची
तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय
आणि सगळ्याचे डोळ्यात आलेलं पाणी,
खूप काही सांगू पाहणारा,
पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा
काशी विश्वेश्वराचा एक डाव…
???????
कोकणातल माझं गाव
तुमच्याही काही कोकणातील आठवणी असतील त्या कॉमेंट बॉक्स मध्ये शेअर करा ??
[11/09, 4:40 pm] Rohit Malap: गाव सोडून गेलेले अभिमानाने बोलतील ” माझा कोकण लय भारी “
नोकरी मिळावी, पोटाची खळगी भरावी, मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून आपण निसर्गरम्य कोकण सोडून शहरात आलो. सिमेंटच्या जंगलातही रमलो, राहिलो…..
मोबाईलचे दिवस आले आणि घरबसल्या ताजी खुशाली मिळू लागली. इंटरनेट, व्हॉटसऍप,एफबी चॅटिंगमध्ये गुंतलेल्या तरुणाईला गावची ओढ आपणच लावायला हवी. आपली कुलदेवता, ग्रामदेवता, गावचे पूर्वजांचे घर… त्या लालमातीचा दर्प, रानफुलांची, फळांची दरवळ, हम्मा अशी हंबरणारी गोठ्यातली गाय, आमराईत कुहू कुहू कुंजन करणारी कोकीळ…., अंगणात पडणारा फुलांचा सडा, पहाटे कोंबड्याचे आरवणे, सकाळची पाखरांची किलबिल, आंब्याच्या झाडावरून टपटप पडणारे आंबट गोड आंबे, रसभरीत काजू बोंडे, काळीभोर जांभळं, करवंदे, लालभडक कोकम, झाडावर लटकणारे फणस….
पाहुण्यांचा पाहुणचार हेच कोकणचे वैभव आहे. गावागावात भक्तिसागर जणू. हास्यवदनी सुगरणी, मायाळू माणसं, झाडाझुडपातून खळखळत वाहणारे पाण्याचे झरे.असे खूप आहे कोकणात. चाकरमान्यांच्या मनिऑर्डरकडे डोळे लावणारे कोकण आता स्वयंरोजगाराकडे वळले आहे. मुंबई शहराकडे वळणारा तरुण कोकणातच स्थिरावतो आहे. शहरात राहणाऱया कोकणी चाकरमान्यांनो,तुमच्या मुलाबाळांना कोकणची, मामाच्या गावाची, आजी-आजोबांच्या मायभूमीची ओढ लावा. सिमेंटचे जंगल सोडा, गावाकडची वनराई बघा. कोकणचे वैभव पाहून तुमच्या मुलांनाही आनंद होईल तेव्हा तीच म्हणतील व मित्रांना सांगतील ” आमचं कोकण लय भारी…”